पांढरा राक्षस कोपला घेतला ६ जणांचा बळी | lokmat News Update | Lokmat News

2021-09-13 1

कुपवाडा-तंगधार मार्गावर साधन टॉपजवळ मोठं हिमस्खलन झालं. यामध्ये एक प्रवाशी वाहन अडकलं.ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला.जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लेह आणि श्रीनगरमध्ये मोठी बर्फवृष्टी झाली. या संपूर्ण परिसरात थंडीमुळे लोकांची स्थिती फार बिकट झाली आहे. कारगिलमधील तापमान वजा 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, हे तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. दिवसागणिक कमी होत जाणाऱ्या तापमानामुळे पाण्याच्या पाईपपासून नदी आणि झरेसुद्धा गोठू लागले आहेत. बर्फाची मजा घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसुद्धा त्रास होत आहे.शिमल्यासह संपूर्ण हिमाचल प्रदेशात थंडीमुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. लाहौलमध्ये तापमान वजा 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires